मानवाने भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा केल्याने पालटत आहे पृथ्वीचा अक्ष (अॅक्सिस) ! – संशोधन
अतिरेकी सिंचनामुळेच जागतिक स्तरावर समुद्राची पातळी वाढली !
न्यूयॉर्क (अमेरिका) – भूजल नागरिकांना आणि पशूधनाला पिण्याचे पाणी पुरवते अन् पाऊस अल्प पडला असतांना पीक सिंचनासाठी साहाय्य करते; तथापि नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, एक दशकाहून अधिक काळ भूगर्भातील पाण्याचा सतत उपसा केल्याने आपला ग्रह ज्या अक्षावर (‘अॅक्सिस’वर) फिरतो, तो प्रतिवर्षी अनुमाने ४.३ सेंटीमीटरने पूर्वेकडे सरकत आहे. हा पालट पृथ्वीच्या पृष्ठभागावरही दिसून येतो. त्यामुळे जागतिक स्तरावर समुद्राची पातळी वाढली आहे, असे निरीक्षण ‘जिओफिझिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये १५ जून या दिवशी प्रकाशित झालेल्या अहवालात संशोधकांनी नोंदवले आहे.
१. वर्ष १९९३ ते २०१० या कालावधीत मानवाने पृथ्वीच्या गर्भातील २ सहस्र १५० अब्ज टन पेक्षा अधिक भूजल काढले. यांपैकी बहुतेक जल पश्चिम उत्तर अमरिका आणि वायव्य भारत येथील आहे, असे या संशोधनात म्हटले आहे.
२. वर्ष २०१६ मध्ये संशोधकांच्या अन्य एका पथकाला असे आढळून आले होते की, वर्ष २००३ ते २०१५ या कालावधीत पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षातील पालट हे हिमनद्या आणि बर्फ यांच्या पालटाशी संबंधित आहे. तसेच पृथ्वीवरील भूजलाच्या साठ्याशी संबंधित आहे.
संपादकीय भूमिका‘निसर्ग हा मानवासाठी असून तो ओरबाडण्याचा मानवाला अधिकार आहे’, या पाश्चिमात्य संकल्पनेमुळेच असे विनाशकारी पालट होत आहेत, यात काय आश्चर्य ! |