औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !
‘पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा मुर्दाबाद’ लिहिलेले भित्तीपत्रक आढळले !
औरंगाबाद (बिहार) – येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जून या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवलेले आढळले.
औरंगाबाद में असामाजिक तत्वों की करतूत, 3 मंदिरों के साथ एक बंद दुकान में फेंके मांस के टुकड़े, डीएम और एसपी ने की लोगों से शांति की अपीलhttps://t.co/m673z710q4
— news4nation (@news4nations) July 2, 2023
यावर ‘पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, तसेच रा.स्व. संघ आणि बजरंग दल मुर्दाबाद’ अशा स्वरूपाचे लिखाण होते. या मजकुराच्या खाली अहले कोरैश असे नाव होते. या घटनांमुळे स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
(सौजन्य : NewZ इंडिया 24)
संपादकीय भूमिकाबहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! |