चिनी आस्थापन ‘अलीबाबा’चे संस्थापक आणि अब्जाधीश जॅक मा यांनी केला पाकिस्तानचा छुपा दौरा !
पाकमधील चिनी दूतावासालाही नव्हती कल्पना !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनमधील अब्जाधीश तथा ‘अलीबाबा ग्रुप’चे सहसंस्थापक जॅक मा यांनी नुकताच पाकिस्तानचा छुपा दौरा केला. या दौर्याची कल्पना पाकमधील चीनच्या दूतावासालाही नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वेळी मा यांच्यासमवेत १ अमेरिकी आणि ५ चिनी नागरिक उपस्थित होते.
Chinese billionaire and co-founder of Alibaba Group, #JackMa, has created a stir among observers with his unexpected visit to Pakistan. https://t.co/EO7jCIH7gY
— Hindustan Times (@htTweets) July 3, 2023
‘बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट’चे माजी अध्यक्ष महंमद अजफर अहसन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून जॅक मा हे २९ जून या दिवशी लाहोर येथे पोचले. ते साधारण २३ घंटे पाकिस्तानमध्ये होते. जॅक मा नुकतेच नेपाळमध्येही गेाले होते. तेथे त्यांनी पंतप्रधान प्रचंड यांची भेट घेतली होती.