‘कॅरी ऑन जट्टा ३’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंद !
अभिनेते हवनकुंडात पाणी टाकत असल्याचे दृश्य !
जालंधर (पंजाब) – ‘कॅरी ऑन जट्टा ३’ या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावरून निर्मात्यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसेना हिंद युवा समितीचे अध्यक्ष इशांत शर्मा आणि पंजाब शिवसेना अध्यक्ष सुनील कुमार बंटी यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती.
शर्मा आणि बंटी यांनी सांगितले की, ‘कॅरी ऑन जट्टा-३’ मध्ये एक आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये हवन चालू असतांना अभिनेते गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लन आणि गुरप्रीत घुग्गी येऊन हवन कुंडात पाणी टाकतात. हा हिंदूंच्या कर्मकांडाचा अपमान आहे. हिंदु धर्मात कोणताही विधी किंवा पूजा केली जाते, तेव्हा आधी हवन केले जाते. याच दृश्याविषयी तक्रार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी निर्मात्यांवर कलम २९५ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पंजाबमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कलम १५३ लागू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कंग आणि गुरप्रीत घुग्गी यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांच्या घराबाहेर आंदोलन करू, अशी चेतावणी शर्मा आणि बंटी यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात कठोर कायदा नसल्याने पुनःपुन्हा हिंदूंच्या धार्मिक भावना विविध मार्गांनी दुखावल्या जातात ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |