गुरूंची आवश्यकता काय ?
एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि स्वतंत्रपणे चालवण्यात आली, तर आधीच्याच ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वतःच प्रयत्न करू लागलो, तर आपल्यातील दोष आणि चुका यांमुळे आपली उन्नति होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग केवळ ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात ‘महाजनो येन गतः स पंथाः ।’ (अर्थ : मोठी माणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.), या न्यायाने गुरूंकडे जावे. (संदर्भ : मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी)