‘भक्तवात्सल्य’ हा आश्रम सुंदर भक्तीसुखे भरला ।
‘भक्तवात्सल्य’ हा आश्रम सुंदर भक्तीसुखे भरला ।
भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला ॥ धृ.॥
औषध विकता विकता स्वामी भक्तराज झाले ।
भवरोगावर औषध द्याया सिद्ध पहा झाले ।
साई श्रींच्या पूर्णकृपेने भाग्योदय झाला ॥ १ ॥
साई श्रींच्या पूर्ण कृपेने अंतरंग बदलले ।
बाह्यांगाने तरी योगी सामान्यची राहिले ।
जो जो आला चरणांपाशी प्रेमसुखे बहरला ॥ २ ॥
अहंतेची कुणा न बाधा सात्त्विक हे सगळे ।
गुरुचरणांशी सद़्भावाने रंगूनिया राहिले ।
नित्य मुक्त त्या अंतःस्थितीचा प्रत्यय हो आला ॥ ३ ॥
‘भक्तराज’ हे विराजित झाले भक्तीच्या हृदयी ।
कीर्ती झाली भारतभूवर रुजले ठायी ठायी ।
भक्तजनांच्या हृदयाकाशी कल्पतरू ठरला ॥ ४ ॥
सिद्धि होती प्राप्त, तरीही दूर तिला ठेविले ।
भक्तवत्सल भक्तांसाठी धावूनिया गेले ।
मातेपरी त्या भक्तजनांना पान्हा पाजियला ॥ ५ ॥
सिद्धांच्या या भेटीसाठी रामदासही आले ।
वात्सल्याचा पाहूनी आश्रम तृप्त मनी झाले ।
‘जय जय रघुवीर समर्थ’ गर्जने परिसर हा भरला ॥ ६ ॥
भजन, कीर्तनी अन् गायनी सगळे भक्त इथे रमले ।
राष्ट्रगुरूंच्या चरणदर्शने भारावून गेले ।
प्रेमपूर हा पाहूनी नयनी नारायण हसला ॥ ७ ॥
– ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे (कीर्तनकार), दत्त मंदिर, मु.पो. कवठेगुळंंद, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
(वर्ष २००३ पूर्वीचे काव्य)