श्री गुरूंच्या ऐतिहासिक धर्मसंस्थापनेच्या कार्यात दायित्व घेऊन सेवा करा !
गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !
‘श्री गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ज्ञानशक्तीद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दृष्टी दिली आहे. ही हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजे अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना (धर्मसंस्थापना) होय. केवळ अवतारच असे कार्य करू शकतात ! आज सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होणे, हे केवळ श्री गुरूंच्या ज्ञानशक्तीचे फलित होय. आता हिंदु राष्ट्र स्थापन होण्याचा काळ जवळ आला आहे; पण भविष्यात संपूर्ण राष्ट्ररचना अध्यात्मावर आधारित होण्यासाठी आजपासून कृती करणे, हे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे. श्री गुरूंच्या या ऐतिहासिक धर्मसंस्थापनेच्या कार्यात दायित्व घेऊन सेवा करा !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्था (१४.४.२०२३)