सनातनची ग्रंथमालिका : गुरूंचे माहात्‍म्‍य अन् शिष्‍याची गुरुभक्‍ती

प्रस्‍तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्‍यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्‍यामुळे शिष्‍याला गुरूंच्‍या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्‍याची गुरूंविषयीची भक्‍ती दृढ होईल, ‘चांगला शिष्‍य होण्‍यासाठी काय करावे’, हे त्‍याला कळेल आणि त्‍याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.

गुरूंचे महत्त्व

‘पित्‍यापेक्षाही गुरु श्रेष्‍ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते ? गुरूंच्‍या अस्‍तित्‍वाने शिष्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कशी होते ?’ इ. प्रश्‍नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !

गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र

‘गुरु, सद़्‍गुरु आणि परात्‍पर गुरु यांतील भेद  कोणता ? भोंदू गुरु होण्‍यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्‍हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्‍त ठेवावा’, असे का म्‍हणतात ? आदी  प्रश्‍नांची  उत्तरे  या  ग्रंथात  दिली  आहेत.


अन्‍य प्रकाशने

  • गुरूंचे शिष्‍यांना शिकवणे आणि गुरु-शिष्‍य संबंध
  • गुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा
  • आदर्श शिष्‍य कसे बनावे ?
सनातनच्‍या ग्रंथांच्‍या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com