श्री गुरूंच्‍या अवतारी कार्यात उत्तम ‘समष्‍टी शिष्‍य’ बनून सहभागी व्‍हा !

गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘८४ लक्ष जीवयोनींमध्‍ये मोक्ष प्राप्‍त करून देणारा मनुष्‍यजन्‍म दुर्लभ आहे’, असे शास्‍त्रात म्‍हटले आहे. असा दुर्लभ मनुष्‍यजन्‍म आज पृथ्‍वीवर ८०० कोटी लोकांना प्राप्‍त झाला आहे; परंतु खरोखर किती जण मोक्षपथावर आहेत ? मोक्षगुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनामुळे आज पृथ्‍वीवर आध्‍यात्मिक उन्‍नतीचा मार्ग सुलभ झाला आहे. ‘गुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करून मोक्षप्राप्‍ती केल्‍यानेच गुरुऋण फेडता येते’, असे गुरुगीतेमध्‍ये सांगितले आहे; म्‍हणूनच आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी श्री गुरूंच्‍या अवतारी कार्यात उत्तम ‘समष्‍टी शिष्‍य’ बनून सहभागी व्‍हा आणि जलद आध्‍यात्मिक उन्‍नती करा !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्‍था (१७.४.२०२३)