बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !
दक्षिण २४ परगणा (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता जियारूल मोल्ला याची अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली. त्याचा मृतदेह येथील फुल मलंचा गावामध्ये आढळला. राज्यात पंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यापासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. मोल्ला याला अनेकदा धमक्या दिल्या जात होत्या, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. राजकीय वैमनस्यातून मोल्ला याची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. यासंदर्भात पोलीस अन्वेषण करत आहेत.
West Bengal Panchayat Elections 2023: Trinamool Congress Leader Shot Dead in South 24 Parganas District, Pre-Poll Death Toll Rises to 12#westbengalpanchayatelections2023 #TMCLeader #shotdead https://t.co/7sLHpP0NdW
— LatestLY (@latestly) July 2, 2023
संपादकीय भूमिकाबंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते ! |