हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन संमत
अटकेपासून संरक्षण
नवी देहली – येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला. हा जामीन एका आठवड्यासाठी आहे.
तीस्ता सीतलवाड़ को मिली सुप्रीम कोर्ट से राहत, गिरफ्तारी पर लगी एक हफ्ते के लिए रोक।
सुप्रीम कोर्ट के तीन जजों की पीठ ने गुजरात हाईकोर्ट के आदेश पर एक हफ्ते के लिए रोक लगा दी है।
इस बीच तीस्ता सुप्रीम कोर्ट की नियमित पीठ के समक्ष गुजरात हाईकोर्ट के आदेश को चुनौती दे सकती हैं।… pic.twitter.com/8W1xRreZyq
— News Tak (@newstakofficial) July 1, 2023
गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड यांचा जामीनअर्ज फेटाळत त्यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश नुकताच दिला होता. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिस्ता सेटलवाड यांच्यावर वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २५ जून २०२२ या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना जामीन संमत करण्यात आला होता.