रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
१. श्री. अविनाशकुमार बादल, प्रदेश अध्यक्ष, हिन्दू पुत्र संघटन, बिहार : ‘आश्रमात शांतीसह समन्वय आणि प्रत्येक मानवाप्रती समभाव मी यापूर्वी इतरत्र कुठेच पाहिले नाही.’
२. मेजर सरस त्रिपाठी, लेखक आणि प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन, गाझियाबाद, उत्तरप्रदेश : ‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’
३. अधिवक्ता हितेश मिश्रा, अलाहाबाद उच्च न्यायालय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश : ‘आश्रम पाहून फारच सुंदर आणि सकारात्मक भाव मनात उत्पन्न झाला. आश्रमातील साधकांचे वागणे अतिशय भावपूर्ण आहे.’
४. श्री. पी.पी.एम्. नायर, आचार्य, केरलीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई, महाराष्ट्र : ‘त्याग आणि शिस्त यांच्या प्रभावाने आम्हाला पुष्कळ प्रेरित केले. मला येथे पुनःपुन्हा येण्याची इच्छा आहे.’
५. डॉ. अजयकुमार जयस्वाल, जैतपुरा : ‘आश्रमातील प्रत्येक क्षण हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे.’
(१५.६.२०२३)