पुणे येथील चांदणी चौकातील पुलाच्या कामामुळे ३ घंटे वाहतूक बंद !
पुणे – चांदणी चौकातील पुलाच्या ‘गर्डर’ (संरक्षक भिंत) उभारणीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गांवरील पुणे येथील ‘चांदणी चौक’ मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रतिदिन मध्यरात्री १२ ते ३.३० पर्यंत बंद राहील. ४ ते १५ जुलै या कालावधीसाठी हा पालट करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली आहे.
मुंबईकडून येणारी जड वाहतूक महामार्गावरील तळेगाव टोलनाका येथे आणि मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने येणारी वाहने ‘सोमाटणे टोलनाका’ येथे थांबवली जातील. या मार्गावरील चारचाकी हलकी वाहने ही भुजबळ चौक, राजीव गांधी पुल मार्गे आणि चांदणी चौकातील हॉटेल विवा मार्गाने कात्रजला जातील.