गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात आज मालेगाव येथे हिंदूंचा मोर्चा !
मालेगाव (जिल्हा नाशिक) – भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै या दिवशी मालेगाव येथे गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला जाणार आहे. सकाळी १० वाजता रामसेतू पुलाजवळील श्रीराम मंदिरात महाआरती करून मोर्च्याला प्रारंभ होईल. शहरात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत ‘इन्सानियत बचाव संघर्ष समिती’ने याच दिवशी शांती आणि बंधुता पदयात्रेची अनुमती मागितली आहे. गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहाद, भुईकोट गडावरील अतिक्रमण आदी सूत्रे उपस्थित करत राणे यांनी २ जुलै या दिवशी मालेगाव येथे येणार असल्याचे म्हटले आहे.