बकरे आणणार्या मुसलमान कुटुंबातील महिलेकडून हिंदूंवर विनयभंगाची तक्रार !
मीरारोड येथे सोसायटीमध्ये ईदनिमित्त कुर्बानीसाठी बकरे आणल्याचे प्रकरण !
मुंबई – मीरारोड येथील जे.पी. इन्फ्रा सोसायटीमध्ये व्यवस्थापकांची अनुमती न घेता मुसलमान कुटुंबाने बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी बकरे आणले होते. मुसलमान कुटुंबाच्या या कृत्याला सोसायटीमधील हिंदु कुटुंबियांनी विरोध केला. यामध्ये सोसायटीच्या नियमाला डावलणार्या मुसलमान कुटुंबावर कारवाई करण्याऐवजी मुसलमान महिलेने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून हिंदूंवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या सोसायटीमधील मोहसिन आणि यास्मिन खान यांनी सोसायटीमध्ये बकर्या आणल्या होत्या. ‘सोसायटी, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कुर्बानी देण्यात येऊ नये’, असा मुंबई महानगरपालिकेचा स्पष्ट आदेश आहे. यानुसार सनदशीर मार्गाने विरोध करणार्या हिंदूंवरच गुन्हा नोंदवणार्या पोलिसांच्या विरोधात हिंदु समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. या वेळी सोसायटीतील हिंदूंनी सोसायटीमध्ये बकरे नेण्याविषयी खान कुटुंबियांना समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र समजावूनही खान कुटुंबियांनी बकर्या सोसायटीच्या बाहेर नेण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही चित्रणा’मध्ये चित्रीत झाला आहे. विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी सनदशीर मार्गाने विरोध करणार्या हिंदूंवरच गुन्हा नोंदवण्याच्या पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला आहे. गृहसंकुलातील सभासदांनी मोहसीन कुटुंबाला बकर्या बाहेर नेण्याची केल्यानंतर यास्मिन खान हिने विरोध करणार्या सभासदांवरच विनयभगांची खोटी तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी निश्चिती न करताच गुन्हा नोंदवला. या प्रकरणी मीरा-भाईंदर येथील पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे कर्तव्यचुकार पोलिसांच्या विरोधात तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहोत. न्यायप्रिय नागरिकांच्या पाठीशी विश्व हिंदु परिषद ठामपणे उभी राहील, असे श्री. मोहन सालेकर यांनी म्हटले.
संपादकीय भूमिका
|