गोहत्या प्रकरणी कडूस परिसरात (पुणे) जमावबंदीचे आदेश लागू !
कडूस (जिल्हा पुणे) – आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून या दिवशी येथील अवैध पशूवधगृहावर बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकली होती. या वेळी दिवसाढवळ्या चालू असलेला गोहत्येचा प्रकार उघडकीस आला. यात कडूस गावचे माजी उपसरपंच, तसेच विद्यमान सदस्य शाबिर इनामदार आणि त्याचा भाऊ शाकिर इनामदार यांनी गोहत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २७ जून ते १० जुलैपर्यंत कडूस येथे जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे खेड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून या आरोपींना अटक केली आहे; परंतु धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार आणि ग्रामस्थांचा उद्रेक लक्षात घेत आरोपींवर वाढीव गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयाने दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. गोहत्येच्या निषेधार्थ गाव बंदची हाक देऊन बंद पुकारत आहे. या आवाहनाला व्यापार्यांसह ग्रामस्थ उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून कडकडीत बंद पुकारला जात आहे.