नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण सनातन ब्राह्मी चूर्ण
१. थकवा – सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण : ‘सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करून ३० मिनिटांनी १ चमचा सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण १ कप दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे. नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. हा उपचार १ ते ३ मास करावा.
२. झोप न लागणे – सनातन ब्राह्मी चूर्ण : ४ चमचे ब्राह्मी चूर्ण ४ वाट्या खोबरेल तेलात घालून उकळावे. हे तेल गाळून थंड झाल्यावर बाटलीत भरून त्यात १० ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक करून घालावा. प्रतिदिन रात्री झोपतांना यातील १ – २ चमचे तेल डोक्याला लावून झोपावे, तसेच १ चमचा ब्राह्मी चूर्ण रात्री झोपतांना अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून पोटात घ्यावे. हा उपचार १ ते ३ मास करावा.
सूचना
१. औषधांच्या प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
२. प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)