वीर सावरकर उवाच
हे हिंदूंनो ! तुम्ही दुर्बल आहात; म्हणून आध्रुवध्रुव (उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत) सगळे जग जरी ओरडत सुटले, तरीही तुम्ही आपला तेजोभंग होऊ देऊ नका ! या सगळ्या आरडाओरडीची मुस्कटदाबी एका विक्रमादित्याचे नाव करू शकेल; या सर्व पोकळ धमक्या एकट्या शिवबाच्या पुण्यस्मरणाने जागच्या जागी जिरून जातील; मग तुमचा इतिहास तर अशा अनेक विक्रमादित्यांनी, समुद्रगुप्तांनी आणि शिवबांनी भरलेला आहे; केवळ संघटन करा, केवळ मनात आणा, म्हणजे आज गेली ५ सहस्र वर्षे तुम्ही जसे सर्वांना पुरून उरला आहात, तसेच त्या कोदंडधारी रावण हत्यारी श्रीरामचंद्राच्या चेतनेने आणि चापाने पुढील ५ सहस्र वर्षे तुम्ही सर्वांना पुरून उराल !
(साभार : ‘समग्र सावरकर, खंड दहावा’ या ग्रंथातील ‘हिंदुत्वाचे पंचप्राण’ प्रकरणातून)