जळगाव येथे २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना अटक !
२७ गोवंशियांची सुटका, बाफना गोशाळेत पाठवणी !
जळगाव – शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे. या कारवाईने या भागात तणावाची स्थिती होती. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (गोवंशहत्याबंदी कायद्याची ऐशी कि तैशी ! – संपादक)
उस्मानिया पार्क भागात महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासमोरील मोकळ्या जागेत एक मंडप टाकण्यात आला होता. शेजारील मोकळ्या जागेत २ जनावरे कापण्यात आली, तर २७ जनावरे ठिकठिकाणी बांधण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यांच्या साहाय्याला दंगा नियंत्रण पथकाची ४ वाहने घटनास्थळी आली.