इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !
इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
२ जुलैला सकाळी पालखी सोहळा, श्रीगुरुपादुकांचे कार्यक्रमस्थळी आगमन, सामूहिक नामसाधना आणि नंतर भंडारा (महाप्रसाद) होणार आहे. दुपारच्या सत्रात प.पू. भक्तराज महाराजांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची चित्रफीत दाखवण्यात येईल. त्यानंतर भक्तीसाधना, संगीत आराधना, सामूहिक नित्य उपासना इत्यादी कार्यक्रम होतील. रात्री भंडारा आणि नंतर प.पू. भक्तराज महाराज यांची प्रासादिक भजने होणार आहेत.
३ जुलैला सकाळी श्रीव्यास पूजन, श्रीसत्यनारायण पूजन, त्यानंतर प.पू. सद्गुरु श्रीअनंतानंद साईश, प.पू. सद्गुरु भक्तराज महाराज, प.पू. सद्गुरु श्रीरामानंद महाराज यांचा गुरुपूजन सोहळा आणि दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर भंडारा होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.