पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी पत्रकार शोएब मलिक यांनी घेतलेल्या मुलाखतीत दिविक कुमार बोलत होते.
दिविक कुमार म्हणाले, ‘‘भारतात राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, सैन्यप्रमुख, मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर मुसलमानांची नेमणूक होते. ते संसदेतही निवडून येऊ शकतात. क्रिकेट आणि चित्रपट सृष्टीत मुसलमानांची वर्णी असते; मात्र भारतात अल्पसंख्यांक मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करणार्या पाकिस्तानमध्ये हिंदूंना या संधी उपलब्ध नाहीत. भारतात सर्वांना समान संधी उपलब्ध आहेत; परंतु पाकिस्तानमध्ये संधींचा अभाव आहे. पाकमध्ये हिंदूंशी भेदभाव केला जातो.
संपादकीय भूमिका
|