डच सरकारकडून पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी !
अॅमस्टरडॅम – डच सरकारने कर्तव्यावर असणार्या पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. डच सरकारच्या मतानुसार या नवीन नियमावलीमुळे पोलिसांविषयी जनतेच्या मनात समानतेची आणि निष्पक्षपाताची भावना निर्माण होईल. डेन्मार्कमधील काही उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी ‘पोलिसांची वर्दी ही निष्पक्षपाताचे प्रतीक असावी’, अशी मागणी केली होती.
डच सरकार का बड़ा फैसला! पुलिस अधिकारियों के हिजाब, क्रॉस और अन्य धार्मिक प्रतीक पहनने पर लगाई रोक https://t.co/iZCFg7XH8K
— Jansatta (@Jansatta) June 30, 2023
त्या मागणीवरून ही नियमावली बनवण्यात आली आहे. न्यायमंत्री दिलन येसीलगोज म्हणाल्या, ‘‘पोलिसांची वर्दी’ या शब्दातच बरेच काही सामावले आहे. पोलिसांना धर्म किंवा श्रद्धा यांची जाहीरपणे अभिव्यक्ती करणे आवश्यक आहे, असे मला वाटत नाही. पोलीसदल हे सरकारचे प्रतिनिधित्व करते. त्यांना वेळप्रसंगी बळाचाही वापर करावा लागतो.’’