इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने इराणमध्ये घुसून आतंकवादी आक्रमणचा कट हाणून पाडला !
जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायलची गुप्तचर संख्या ‘मोसाद’ने इराणमध्ये घुसून इस्रायलवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट उधळून लावला. हा कट रचण्याचा प्रयत्न करणारा युसेफ शाहबाजी अब्बासलिलू याला पकडून इस्रायलमध्ये आणले.
मोसाद ने ईरान में घुसकर आतंकी को किया किडनैप, साइप्रस में यूहदियों की होने वाली थी हत्या, निकला पाक कनेक्शन #pakistan #iran #israel #इजरायल #पाकिस्तान #ईरान https://t.co/tI0n1wVnOY
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) July 1, 2023
मोसादने प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटले आहे की, आम्ही इराणमध्ये जाऊन एका आंतकवादी संघटनेतील सूत्रधाराला पकडले आहे. त्याच्या केलेल्या चौकशीत त्याने आतंकवादी कटाची स्वीकृती दिली आहे. इराण असो वा आणखी कुठले ठिकाण, जगात कुठेही ज्यू अथवा इस्रायली नागरिकांच्या विरोधात कुणी आतंकवादाला प्रोत्साहन देत असेल, तर आमचे हात अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचतील.
संपादकीय भूमिकाछोटासा इस्रायल असे करू शकतो, तर गेली ३३ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादाचा सामना करणारा भारत असे का करू शकत नाही ? |