पाकिस्तानमध्ये धर्मांध मुसलमानांनी गुरुद्वारामध्ये घुसून केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !
स्थानिकांनी पकडून दिलेल्या धर्मांधांना पोलिसांनी दिले सोडून !
सुक्कुर (पाकिस्तान) – पाकमधील सिंध प्रांतातील सुक्कुर शहरातील सिंह सभा गुरुद्वारा परिसरात घुसून धर्मांध मुसलमानांनी येथील सेवकर्यांना धक्काबुक्की केली. येथील कीर्तन बंद करण्यास भाग पाडले, तसेच गुरु ग्रंथसाहिबचाही अवमान केला. स्थानिक शिखांनी या धर्मांधांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी न करता त्यांना सोडून दिले.
पाकिस्तान में अल्पसंख्यकों पर हो रहा अत्याचार थमने का नाम नहीं ले रहा है। #Pakistan #Gurudwara #Sikhshttps://t.co/d4vMqtzbVV
— India TV (@indiatvnews) July 1, 2023
विदेशातील ‘युनायटेड सिख’ या संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. या संघटनेने ट्वीट करून म्हटले की, आम्ही अन्य शीख संघटनांसमवेत पाकिस्तान वाणिज्य दूतावासाच्या अधिकार्यांशी चर्चा करून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत.
संपादकीय भूमिकापाकच्या साहायाने खलिस्तानची मागणी करणारे खलिस्तानी आतंकवादी संघटना याविषयी का बोलत नाहीत ? पाकमधील धर्मांधांच्या लेखी शीख हेही काफीरच आहेत, हे त्यांच्या लक्षात आहे का ? |