श्रीक्षेत्र माहूर येथे गोवंशियांच्या वाहतुकीची चौकशी करणारी हिंदु व्यक्ती धर्मांधांच्या मारहाणीत गंभीर घायाळ !
|
श्रीक्षेत्र माहूर (जिल्हा नांदेड), १ जुलै (वार्ता.) – येथील श्री. सोनू चौधरी आणि श्री. आतिष राठोड यांनी २९ जून या दिवशी नांदेड मार्गावर गोवंशियांनी भरलेल्या एका वाहनाविषयी चौकशी केली. या वेळी ‘गाडी सलीम कुरेशी यांची आहे’, असे सांगून चालकाने भ्रमणभाष करून अन्य धर्मांधांना बोलावून घेतले (यावरून धर्मांधांचे संघटन कसे असते ?, हे लक्षात येते ! – संपादक) यानंतर धर्मांधांनी श्री. सोनू चौधरी यांना लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगड यांद्वारे पुष्कळ मारहाण केली, तसेच श्री. सोनू यांची २ तोळे सोन्याची साखळीही हिसकावून घेतली. गंभीररित्या घायाळ झालेल्या सोनू चौधरी यांच्यावर यवतमाळ येथे उपचार चालू आहेत.
(सौजन्य : ABP MAJHA)
या प्रकरणी श्री. आतिष राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ९ धर्मांधांंना कह्यात घेतले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी ५ जणांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणी संतांसमवेत हिंदूंनी ‘रस्ता बंद’ आंदोलन करून पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. (पोलीस कारवाई करत नसल्याने संत आणि हिंदू यांना आंदोलन करावे लागते, हे संतापजनक ! अशा कर्तव्यचुकार पोलिसांना निलंबितच करायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाउद्दाम धर्मांध बिनधास्तपणे कायदा हातात घेतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय उरलेले नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! आता सरकारनेच गुंड धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली पाहिजे ! |