गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या
पणजी, ३० जून (वार्ता.) – गोव्यातील एका कॅसिनोमध्ये पैसे हरल्यानंतर पुण्यातील एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सदर कॅसिनोवर पुण्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन गोव्यातील काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलीस महासंचालकांना दिले आहे.
Pune businessman dies by suicide after gambling losses. @INCGoa demand FIR against the two sisters from Goa
WATCH : https://t.co/9NV7mEXv4h#Goa #GoaNews #Congress #demands #FIR #Casino #women #staff pic.twitter.com/ruzVoyycH9— In Goa 24×7 (@InGoa24x7) June 30, 2023
‘अशा प्रकारे महाराष्ट्रातील व्यावसायिकांच्या हत्या होऊ नयेत, यासाठी कॅसिनोंच्या या फसवणूक करण्याच्या पद्धतींवर कडक लक्ष ठेवण्यात यावे’, अशी मागणी काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी केली आहे. ते म्हणाले की, पुढील काळात फसवणुकीमुळे कुणी आत्महत्या केली, तर त्याला सर्वस्वी सरकार उत्तरदायी ठरेल.