मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही ! – पंकजा मुंडे, भाजप
बीड – ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यावर ‘गळ्यात कोणतीही फुलाची माळ घालणार नाही’, असे सांगितले होते. आता ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षण वाचले आणि लोकांनी गळ्यात हार घातले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. बीडमधील एका सभेत त्या बोलत होत्या. वर्ष २०२४ हे इतिहास घडवणारे, म्हणजेच पालटणारे वर्ष आहे. मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. ‘सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात’, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात म्हटले आहे की, आरक्षणाच्या नावाखाली सरकार त्याचे दायित्व झटकत नाही. आरक्षणासाठीही आपण प्रयत्न करत आहोत; पण त्यासाठी भावनिक मुद्दा करून काही साध्य होणार नाही.