रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
श्री. पिंकु कुमार भुईयाँ (सारथी सहायता समिती), हजारीबाग, झारखंड.
१. ‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले.
२. संगीत आणि संशोधन
हे संशोधन पाहिल्यावर मला असे जाणवले की, जर आपण भावपूर्ण आणि श्रद्धायुक्त ईश्वरी विश्वातील संगीत जाणून कला सादर केली, तर आपली सकारात्मक ऊर्जा वाढते.’
श्री. किशोर पडवळ, उद्योगपती, रायगड, महाराष्ट्र.
१. श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला प्रत्यक्ष श्री भवानीमातेचे दर्शन झाले.
२. संगीत आणि संशोधन
हे संशोधन पहातांना ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, तसेच ‘गुरुकृपेविना आध्यात्मिक उन्नती होत नाही’, हे सत्य गुरुदेवांच्या कृपेने लक्षात आले. गुरुकृपा आहे, तेथेच आनंद आणि शांती आहे.
३. रामनाथी आश्रम म्हणजे या ‘युगातील वैकुंठ’ !
‘सनातन आश्रम म्हणजे या ‘युगातील वैकुंठ’ आहे’, असे मला वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
(१५.६.२०२३)