शिव आणि विष्‍णूचे स्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यामध्‍ये काहीच भेद न जाणवणारी कु. स्‍मितल भुजले !

१. भगवान शिवाच्‍या छायाचित्रात परात्‍पर गुरु डॉक्‍टर दिसणे आणि दोघांमध्‍ये काहीच भेद नसल्‍याचे जाणवणे

कु. स्‍मितल भुजले

‘आजपर्यंत मला परम पूज्‍य डॉक्‍टरांमध्‍ये शिव दिसायचा. आज मला प्रथमच शिवामध्‍ये परम पूज्‍य डॉक्‍टर दिसत आहेत. आज मी शिवाचेे चित्र बघतांना ‘महादेव’ अशी हाक न मारता ‘परम पूज्‍य’ अशी हाक मारली. तेव्‍हा ‘गुरु हे देवापेक्षा श्रेष्‍ठ आहेत’, असे मला वाटले. तरीही त्‍या दोघांमध्‍ये काहीच भेद नाही. दोघेही मला एकमेकांकडे घेऊन जातात. परम पूज्‍य, मला शिवलोकातही तुम्‍हीच भेटणार आहात; म्‍हणून मला आता कसलीच भीती वाटत नाही.

२. हलाहल विष प्राशन केलेल्‍या शिवाप्रमाणे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या खोलीकडे शांतपणे चालत जाणे

एकदा तुम्‍ही तुमच्‍या खोलीच्‍या दिशेने एकटे हळूहळू भिंतीचा आधार घेत जात होतात. मला तुम्‍ही पाठमोरे दिसत होतात. तेव्‍हा तुम्‍हाला पाहून वाटले की, ‘महादेवाने जेव्‍हा हलाहल विष प्राशन केले असेल, तेव्‍हाही तो असाच शांतपणे त्‍याच्‍या ध्‍यान करण्‍याच्‍या ठिकाणी चालत जात असेल. तसेच तुम्‍ही काहीही न बोलता, कुणाला न सांगता, इतरांना आपला त्रास कळू नये, भक्‍तांना त्रास होऊ नये, काळजी वाटू नये; म्‍हणून जात होतात.

तुमच्‍यात आणि महादेवामध्‍ये काही भेद नाही. अशा शिवस्‍वरूप गुरुमाऊलीला माझा साष्‍टांग नमस्‍कार !’

– कु. स्‍मितल भुजले, फोंडा, गोवा

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक