दासबोधातील सद़्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
७. व्यापक गगन आणि गगनाच्याही पलीकडचे निर्गुण परब्रह्म असलेले गुरुतत्त्व !
‘उपमे म्हणों गगन ।
तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण ।
सद़्गुरूस गगनाचा ॥ – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १९
अर्थ : सद़्गुरूंना गगनाची उपमा द्यावी, तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे. त्यामुळे त्यांना गगनाची उपमासुद्धा हीन ठरते.’
७ अ. निर्गुण, निराकार आणि सर्वांठायी वसलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आकाशासारखे व्यापक आहेत’, असे बुद्धीला वाटते; परंतु प्रत्यक्ष अनुभवले, तर ते आकाशाच्याही पलीकडे असलेले निर्गुण परब्रह्म, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांडमालिकांचे संचालन करणारे अमर्याद सर्वव्यापी तत्त्व आहेत.
अशा निर्गुण, निराकार अन् सर्वांठायी वसलेल्या परब्रह्मस्वरूप गुरुतत्त्वाची आपण नित्य प्रचीती घेऊया. सार्या चराचरात आणि आपल्या अंतरातही श्री गुरूंच्या त्या दिव्य रूपाला अनुभवूया !’
(क्रमश:)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (३०.६.२०२३)