(म्हणे) ‘समान नागरी कायदा झाल्यास परिणामांचा करणार अभ्यास !’
मुंबई, ३० जून (वार्ता.) – केंद्रशासनाच्या विधी आयोगाने समान नागरी कायदा लागू करण्याविषयी जनतेकडून मते मागवली आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २ दिवसांपूर्वी समान नागरी कायद्याचा काँग्रेसकडून अपप्रचार करण्यात आल्याचे वक्तव्य केले. देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या शक्यतेवरून कायदा लागू झाल्यास होणार्या परिणामांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.