कडूस (पुणे) येथे गोहत्येच्या निषेधार्थ गावकर्यांचा मोर्चा !
पुणे – येथील कडूस (ता. खेड) येथे २९ जून या दिवशी गोहत्या केल्याची घटना समोर आल्याने कडूस गावात निषेधमोर्चा काढण्यात आला. मोर्च्यामध्ये सहस्रो युवक सहभागी झाले होते. संबंधित आरोपींकडून रहदारीच्या ठिकाणी गोहत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री केली जात होती. याच्या निषेधार्थ निषेधमोर्चा काढला. गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ३० जून या दिवशी गाव बंद पुकारण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिका :गोवंशहत्या बंदी कायदा लागू असतांना गावकर्यांना असा मोर्चा का काढावा लागतो ? यावरून कायद्याची कठोर कार्यवाही केली जात नाही, तसेच पोलिसांचा धाकही संपला असल्याचे लक्षात येते. |