रांजणा डोंगरावरील ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित !
जुन्नर – येथून जवळ असलेल्या रांजणा डोंगर शिखरावरील टेहळणी बुरुज आणि आदिवासी क्रांतिकारक बंडकरी नवले यांची कातळातील गुहा दुर्लक्षित आहे, अशी खंत इतिहासप्रेमींनी व्यक्त केली. या ऐतिहासिक ठिकाणाचे जतन आणि संवर्धन वन विभागाने करावे, अशी मागणी सध्या होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) गिर्यारोहक गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी नेहमी येथे येतात. पिण्याच्या पाण्यासाठी कातळामध्ये सिद्ध केलेले दोन रांजण येथे असल्याने या डोंगराला रांजण असे नाव पडले असल्याचा तर्क आहे.
बाळा डामसे या तरुणाने पर्यटन आणि गिर्यारोहण वाढावे, यासाठी रांजणा डोंगर शिखराच्या खाली असलेल्या पाण्याच्या दोन टाक्या स्वच्छ केल्या आहेत. तसेच पर्यटक आणि गिर्यारोहकांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करतात.