नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिले आहे. सध्या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची अपर्कीती करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येेथे केली. ३० जून या दिवशी गंगापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या १ सहस्र ७५ कोटी रुपयांच्या ‘हर घर नल’ योजनेचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
गंगापूर तालुक्यातील २०९ गावांसह त्या गावांमधील वाड्या आणि वस्त्या येथे डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक घरात नळ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार कटीबद्ध आहे. एस्.टी. महामंडळात महिलांना अर्धे तिकीट आहे. त्यामुळे ‘बाहेरचे काम करायला तुम्ही जाऊ शकता’, असे त्यांनी महिलांना सांगितले.
मराठवाड्याला मिळणार पाणी !
जल जीवन मिशन अंतर्गत ३७३ गावे गंगापूर-वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.@Dev_Fadnavis @PMOIndia @jaljeevan_ pic.twitter.com/MhLxPhwHTq
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) June 30, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. या माध्यमातून मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी मिळणार आहे.