भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचे चित्र असायला हवे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली
आर्य चाणक्य यांनी अर्थव्यवस्थेविषयी भाव, स्वभाव आणि अभाव अशी ३ सूत्रे सांगितली. भाव म्हणजे जन्माने आपण हिंदु आहोत, स्वभाव म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आपण सनातनी हिंदु आहोत; परंतु आपल्यात अभाव आहे, तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा. भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचे चित्र असायला हवे, तेथे म. गांधी यांचे चित्र आहे, हाच अभाव आहे.