कोल्हापूर येथे ८ जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धा !
कोल्हापूर – ८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रसिद्ध अशी मार्सेलीस उडी मारली. या उडीने तत्कालीन ब्रिटीश सरकार तर हादरलेच; पण ही उडी जगभरात चर्चेचा विषय बनली. या उडीच्या स्मरणार्थ ‘सावली सोशल सर्कल’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सावरकर जलतरण चषक’ या नावाने पोहण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला ‘कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटने’ने मान्यता दिली आहे. ही स्पर्धा ५ वयोगटांत होत असून ८, १०, १२, १४ आणि १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले आहेत. या शिवाय ‘फ्री स्टाईल‘, ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’ आणि ‘बटरफ्लाय’ अशा प्रात्यक्षिकांमध्येही स्पर्धा होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवणार्या स्पर्धकास ‘मॅन ऑफ द कॉम्पिटिशन’ हा पुरस्कार देण्यात येईल. ही स्पर्धा ८ जुलैला राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय, कुरुकली, राधानगरी रस्ता येथे होईल. स्पर्धकांनी https://neartail.com/in/sawalisocialcircle या ‘लिंक’वर जाऊन नोंदणी करावी.