गोव्यात घडणार्या गंभीर गुन्ह्यांसाठी परप्रांतीय नव्हे, तर पोलीसच उत्तरदायी !
‘गोवा राज्यात घडणार्या गंभीर गुन्ह्यांसाठी गोव्याबाहेरील लोक मोठ्या प्रमाणात उत्तरदायी आहेत. गोव्यात शांतताप्रिय लोक रहातात. ते हत्येसारखे गंभीर गुन्हे करणार नाहीत. गोव्यातील लोक संपत्ती किंवा कौटुंबिक गोष्टी यांच्याशी संबंधित गुन्हे करतात किंवा अधिकाधिक ते एखाद्याला काही दुखापत करू शकतात’, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.’ (१२.६.२०२३)