भारताच्या अर्थव्यवस्थेवर या योजनेचा परिणाम दिसला, आपणही तेच करायला हवे ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून भारताच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचे कौतुक !

मॉस्को (रशिया) – भारत हा असा देश आहे, जो विदेशी आस्थापनांना भारतात काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा (केंद्र सरकारची एक योजना) प्रारंभ काही वर्षांपूर्वी केला होता. भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत आहे, असे कौतुकोद्गार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताविषयी काढले आहेत. ते येथे ‘एजन्सी फॉर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह’ या संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी रशियामध्ये देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे उदाहरण दिले.

पुतिन पुढे म्हणाले की, जेव्हा पाश्‍चिमात्य देश रशियासमवेत व्यापारावर सातत्याने बंदी घालत आहेत, तेव्हा आपण भारतासारखेच आपल्या देशातील आस्थापनांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे.