इराकमधील स्विडनच्या दूतावासावर आक्रमण करून तोडफोड
|
बगदाद (इराक) – स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथील सेंट्रल मशिदीबाहेर सलवान मोमिका या व्यक्तीने न्यायालयाकडून अनुमती घेऊन २८ जून या दिवशी कुराण जाळले होते. यामुळे संतप्त झालेल्या बगदादमधील मुसलमानांनी येथील स्विडनच्या दूतावासावर आक्रमण केले. त्यांनी दूतावासात घुसून तोडफोड केली. काही जणांनी दूतावासाचे प्रवेशद्वार तोडले, तर काही जण दूतावासाच्या भिंतींवर चढले होते. शिया नेता मोक्तदा सद्र आणि त्याचे समर्थक यांनी हे आक्रमण केले. ते जवळपास १५ मिनिटे दूतावासात होते. तेथे सैनिक पोचल्यावर ते शांततेच बाहेर पडले. दूतावासाच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने इराकचे सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. आक्रमणाच्या घटनेविषयी स्विडनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आमच्या दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.
Iraq: Protesters break into Swedish embassy in Baghdad after ex-Muslim Iraqi refugee burns Quran in front of a mosque in Stockholmhttps://t.co/qBQtsD9MUL
— OpIndia.com (@OpIndia_com) June 30, 2023
या आक्रमणापूर्वी येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी स्विडनच्या राजदूतांना हटवण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्याकडून पत्रकेही वाटण्यात आली. विशेष म्हणजे सलवान मोमिका हा मूळचा इराकी नागरिक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने इराकमधून पलायन करून स्विडनमध्ये आश्रय घेतला होता.
जगभरातील इस्लामी देशांकडून विरोध
१. कुराण जाळल्याच्या घटनेचा जगभरातील इस्लामी देशांकडून विरोध केला जात आहे. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ही घटना जगभरातील मुसलमानांच्या धार्मिक भावना भडकावणारी आहे.
२. इस्लामी देशांची संघटना ‘इस्लामिक सहकार्य संघटना’ (ओआयसी) हिने म्हटले आहे की, या घटनेनंतरच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात येईल.
३. मोरक्को देशाने या घटनेचा विरोध म्हणून स्विडनमधून त्याच्या राजदूताला माघारी बोलावले आहे.
४. तुर्कीयेचे परराष्ट्रमंत्री हकन फिदान यांनी या घटनेची निंदा केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लाम विराधी कृत्यांना अनुमती देणे स्वीकारता येणार नाही.
५. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भेदभाव, द्वेष आणि हिंसा यांना प्रोत्साहन देणार्या कृत्यांना योग्य ठरवले जाऊ शकत नाही. (पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर होणार्या आक्रमणांविषयी पाक नेहमीच म. गांधी यांच्या तीन माकडांप्रमाणे वागतो, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक)
६. सौदी अरेबिया, इराण, इजिप्त, सीरिया, येमेन, पॅलेस्टाईन आदी इस्लामी देशांनीही याचा विरोध केला आहे.
संपादकीय भूमिकास्विडनमध्ये कुराण जाळल्यावर जगभरातील मुसलमान संघटित होतात. भारतात ‘मनुस्मृति’, तसेच ‘रामचरितमानस’ या धर्मग्रंथांना सर्रास जाळले जाते; मात्र जन्महिंदू याविषयी संयतपणे साधा निषेधही नोंदवत नाहीत, हे लज्जास्पद ! |