मेक्सिको देशात तीव्र उष्णतेमुळे १०० जण मृत्यूमुखी

मॅक्सिको – देशात उष्णतेच्या लाटेमुळे मागील २ आठवड्यांत १०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अतिसारामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील काही ठिकाणांचे तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहे.

देशात तापमानवाढीमुळे विद्युतपुरवठ्याची मागणी वाढली आहे. लोकांची वाढती मागणी लक्षात घेता त्याची पूर्तता करण्यास सरकारी यंत्रणा हतबल असल्याने अनेक ठिकाणी विद्युत्पुरवठा खंडित करण्यात आला.