मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग !
मुंबई – पश्चिम रेल्वेमार्गावरील ‘ग्रँट रोड’ स्थानकाजवळ धावत्या ‘लोकल ट्रेन’मध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढली. या युवकाने अश्लील वक्तव्य करून तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार मागील आठवड्यात २३ जूनच्या रात्री घडला. या वेळी युवतीने आरडाओरडा केल्यावर छेड काढणार्या युवकाने रेल्वेचा वेग अल्प होताच उडी मारून पलायन केले. या प्रकरणी २७ जून या दिवशी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप गुन्हेगाराचा शोध लागलेला नाही.
मुंबईत धावत्या लोकलमध्ये विनयभंगाची घटना, ग्रँट रोडजवळ अश्चिल चाळे करत तरुणाकडून युवतीची छेड https://t.co/w7fghuDry3 #mumbailocal #mumbainews
— ABP माझा (@abpmajhatv) June 30, 2023
काही दिवसांपूर्वीही झाला होता एका महिलेचा विनयभंग !
काही दिवसांपूर्वी गिरगाव येथून बेलापूर येथे जाणार्या एका विद्यार्थिनीचा एका युवकाने विनयभंग केला होता. युवतीने आरडाओरडा केल्यावर मशीद बंदर स्थानकावर उतरून युवकाने पलायन केले होते. महिलांच्या डब्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत पोलिसांचा पहारा असतो; मात्र मागील काही दिवसांमध्ये दिवसाढवळ्याही लोकल ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग करण्याच्या घटना घडत आहेत.
संपादकीय भूमिकावासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे ! |