पाकच्या नागरिकांची हज यात्रा रहित होण्याची शक्यता !
सौदी अरेबियाची ३९४ कोटी रुपयांची उधारी न चुकवल्याचा परिणाम
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाच्या ‘जनरल अथॉरिटी ऑफ सिविल एविएशन’ या खात्याने पाकचे सरकारी विमान वाहतूक आस्थापन ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन’ला ४ कोटी ८० लाख डॉलरची (सुमारे ३९४ कोटी रुपये) उधारी चुकवण्यास सांगितले आहे. जर पाकने ही रक्कम दिली नाही, तर पाकच्या नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही. पाकचे ५० सहस्र नागरिक हज यात्रेसाठी जाणार आहेत.
सऊदी अरब की सिविल एविएशन अथॉरिटी ने पाकिस्तान को नोटिस जारी किया है. #Pakistan | #SaudiArabia https://t.co/S4hMrgoLH2
— News18 Hindi (@HindiNews18) June 29, 2023
संपादकीय भूमिकादिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकचे असेच दिवस येणार आहेत, याच आश्चर्य ते काय ? |