मडगाव (गोवा) येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला मदरसा तात्पुरता बंद

रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला वादग्रस्त मदरसा

मडगाव, २९ जून (वार्ता.) – मडगाव येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी अवैधपणे उभारण्यात आलेल्या मदरशावरून धार्मिक तणाव निर्माण झाल्याने हा मदरसा तात्पुरता बंद ठेवण्यात यावा, अशी सूचना रुमडामळ दवर्ली पंचायतीच्या सचिवांनी दिली आहे. रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून या परिसरातील वातावरण अशांत झाले होते. त्यापूर्वी विनायक वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती. पंचायतीच्या ग्रामसभेत या सूत्रावर बराच वाद निर्माण झाला होता.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

त्यानंतर पंचायत सचिवांनी ‘हा मदरसा तात्पुरता बंद ठेवावा, तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करू नये’, अशी सूचना दिली आहे. शुक्रवारी येथील मशिदीमध्ये नमाज पढतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मशीद परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (नमाज पढतांना अनुचित प्रकार घडत नाहीत; कारण हिंदु सहिष्णु आहेत. संताजी-धनाजी या २ मराठ्यांच्या तावडीत क्रूरक्रर्मा औरंगजेब सापडला होता; पण तो त्या वेळी नमाज पढत असल्याने या २ मराठ्यांनी त्याचे शीर धडावेगळे केले नाही. हा आपला इतिहास आहे, तर शुक्रवारचा नमाज पढून आल्यानंतर काश्मीरसह देशात अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडले आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) आता पुन्हा या परिसरात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये; म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तासाठी मडगाव, मायणा कुडतरी, कोलवा, फातोर्डा आणि कुंकळ्ळी पोलीस ठाण्यांतील पोलिसांसह आय.आर्.बी.च्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. (धर्मांध मुसलमानांची जेथे वस्ती असते, तिथे नेहमी अशीच अशांतता का असते ? – संपादक)


हे ही वाचा –

गोवा : रुमडामळ येथे अनधिकृत गोमांसविक्री दुकान चालू करण्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा तणाव
https://sanatanprabhat.org/marathi/696244.html

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप
https://sanatanprabhat.org/marathi/695446.html