वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्‍या आधी साधिकेने केलेली मानसपूजा आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा पहातांना होत असलेली पूजा यांत भेद नसणे

१. गुरुपौर्णिमेच्‍या आधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमावरील कळसाला नमस्‍कार करून तेथे प्रार्थना करणे आणि त्‍यानंतर त्‍या दिवशी मानसपूजा करणे

‘गुरुपौर्णिमेच्‍या आधी पंधरा दिवसांपासून मी पहाटे पाच वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमावर असणार्‍या कळसाला नमस्‍कार करून तेथे प्रार्थना करत असे. त्‍यानंतर ध्‍यानमंदिरात नामजप करण्‍यासाठी जात असे. तेथे प्रार्थना, नामजप, कृतज्ञता आणि आत्‍मनिवेदन असे जमेल तेवढे करत होते. सात ते आठ दिवसांपासून अकस्‍मात् माझ्‍या मनात मानसपूजा करण्‍याचा विचार आला आणि त्‍याचदिवशी मानसपूजा केली.

२. पूजा करत असतांना समोर दत्तात्रेयांच्‍या निर्गुण पादुका दिसणे आणि त्‍या पादुकांचीच पूजा करणे अन् परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या पादुका न दिसता ‘दत्तात्रेयांच्‍या निर्गुण पादुका का दिसतात ?’, असा विचार येणे

पूजा करत असतांना समोर दत्तात्रेयांच्‍या निर्गुण पादुका दिसल्‍या आणि मी त्‍या पादुकांचीच पूजा केली. त्‍या वेळी माझ्‍या मनात ‘प.पू. गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) पादुका न दिसता मला दत्तात्रेयांच्‍या निर्गुण पादुका का दिसतात ?’, असा विचार माझ्‍या मनात येत असे. असेे नेहमी होऊ लागले. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सकाळी कळसाला नमस्‍कार करून ‘हे दत्तात्रेय स्‍वामी, ‘आज तुम्‍ही मला दर्शन देणार आहात. तुम्‍ही माझ्‍याकडून पूजा करून घेणार आहात’, अशी प्रार्थना झाली.

३. मानसपूजा करतांना ‘दत्तात्रेयांच्‍या निर्गुण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या पादुका ‘एक आड एक’, असे दिसणे, दत्तात्रेय स्‍वामी आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना, ‘आज तुम्‍ही प्रत्‍यक्ष गुरुपूजा करून घेणार आहात’, अशी प्रार्थना होणे

आज मानसपूजा करत असतांना ‘दत्तात्रेयांच्‍या निर्गुण आणि प.पू. गुरुदेवांच्‍या ध्‍यानमंदिरात ठेवलेल्‍या पादुका ‘एक आड एक’, असे मला दिसत होते. त्‍या वेळी माझे मन विचलित न होता मानसपूजेतच एकाग्र होत होते. पूजा झाल्‍यावर प्रार्थना करत असतांना ‘हे गुरुमाऊली (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), दत्तात्रेय स्‍वामी, ‘आज तुम्‍ही मला प्रत्‍यक्ष दर्शन देणार आहात. आज प्रत्‍यक्ष गुरुपूजा करून घेणार आहात’, अशी प्रार्थना झाली.

 ४. त्‍यानंतर गुरुपौणिमेचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना श्री. विनायक शानभाग पूजाविधीची सूत्रे सांगत असतांना प्रत्‍यक्ष होत असलेली स्‍थुलातील पूजा आणि मी सकाळी केलेली मानसपूजा दोन्‍ही समोर दिसत होत्‍या. त्‍यात काहीही भेद नव्‍हता.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक