अंतिम निर्णय होईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, तर औरंगाबाद हे नाव वापरणार !
राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयाला आश्वासन !
छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ‘अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही’, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारनेही न्यायालयाला ‘औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नाही’, असे आश्वासन दिले. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते; मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.