सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेत जलद उन्‍नती होण्‍यासाठी सांगितलेल्‍या ‘अष्‍टांगसाधने’विषयी जाणवलेली सूत्रे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेत जलद उन्‍नती होण्‍यासाठी अभिनव अशी ‘अष्‍टांगसाधना’ शोधून काढली आहे. ती अंगीकारून सनातन संस्‍थेच्‍या सहस्रो साधकांना लाभ झाला आहे. या अष्‍टांगसाधनेमध्‍ये ‘स्‍वभावदोष-निर्मूलन (तसेच गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्‍संग, सत्‍सेवा, त्‍याग आणि प्रीती’ ही ८ अंगे, म्‍हणजे टप्‍पे आहेत. या साधनाप्रक्रियेविषयी मला पुढील सूत्रे जाणवली.

१. या अष्‍टांगसाधनेतील ‘स्‍वभावदोष-निर्मूलन (तसेच गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती आणि सत्‍संग’ ही पहिली ५ अंगे मनाद्वारे करू शकणारी आहेत, तर उर्वरित ‘सत्‍सेवा, त्‍याग आणि प्रीती ही अंगे कृतीद्वारे करावी लागणारी अंगे आहेत. त्‍यामुळे आपल्‍याला काही कारणाने बरे नसतांना आपण पहिल्‍या ५ अंगांद्वारे सहजतेने साधना करू शकतो.

२. या अष्‍टांगसाधनेतील ‘स्‍वभावदोष-निर्मूलन (तसेच गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप आणि भावजागृती’ ही पहिली ४ अंगे मनोलय करणारी आहेत. नंतरची ‘सत्‍संग, सत्‍सेवा आणि त्‍याग’ ही ३ अंगे बुद्धीलय करणारी आहेत आणि शेवटचे ‘प्रीती’ हे अंग अहंलय करणारे आहे.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२६.६.२०२३)