सोलापूर येथे ‘आय लव्ह पाकिस्तान’ लिहिलेल्या फुग्यांची विक्री करणारे कह्यात !
विक्रेत्यांकडे फुगे कोठून आले ? याचा पोलिसांकडून शोध चालू
सोलापूर – शहरातील ईदगाह मैदान परिसरात ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे लिहिलेल्या फुग्यांची विक्री करणार्या दोन युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले. या विक्रेत्यांकडे हे फुगे कोठून आले ? याचा शोध पोलीस घेत आहेत, तसेच या माध्यमातून जातीय तेढ वाढवण्याचा काही प्रयत्न आहे का ? याचाही शोध घेतला जात आहे. फुग्यांवर पाकिस्तानचे चिन्ह आणि ‘आय लव्ह पाकिस्तान’, असे लिहिलेले होते. या वेळी ‘आम्ही नेहमीप्रमाणे फुगे विकत आहोत. त्यावर काय लिहिले आहे ? हे पाहिले नाही. ते वाचताही येत नाही’, असे फुगे विक्रेत्यांनी सांगितले. (फुगे विक्रेत्यांच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विक्रेत्यांकडे हे फुगे कोठून आले ? याच्या मुळाशी जाऊन अन्वेषण करणे आणि संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
Maharashtra: ‘Love Pakistan’ balloons sold in Solapur near Idgah ground on Bakrid, arrested seller claims to be illiteratehttps://t.co/2y0Q5ChDDq
— OpIndia.com (@OpIndia_com) June 29, 2023
इदगाह मैदान येथे नमाजपठणासाठी आलेल्या एका व्यक्तीचे फुगेवाल्याकडे लक्ष गेले. त्या वेळी त्याला फुग्यांवर आक्षेपार्ह लिखाण असलेले फुगे आढळून आले. त्यानंतर त्याने त्वरित पोलिसांना त्याविषयी माहिती दिली.