वन विभागाचा तपासणी नाका चालू झाल्याने रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणार्यांना चाप !
पुणे – सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाटा येथे वन विभागाने तपासणी नाका चालू केल्याने बंदी असतांना रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणार्यांवर आता आळा बसला आहे. रात्री अपरात्री प्रेमी युगुल आणि इतर व्यक्ती बिनदिक्कत सिंहगडावर जात असल्याने वन विभागाने कार्यवाही करत हा तपासणी नाका उभारला असून रात्रंदिवस या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचार्यांना बसण्यासाठी कक्ष सिद्ध केला असून ‘सोलर यंत्रणे’द्वारे या ठिकाणी कायमस्वरूपी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच तिन्ही बाजूंच्या रस्त्यांकडे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. (हे यापूर्वीच का केले नाही ? – संपादक)
भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसहा ते सात वाजल्यानंतर कोंढणपूर फाट्यावरून गडाकडे जाणारा दरवाजा बंद करण्यात येतो. याठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.