आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपात पूजा !
कोल्हापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीपूजक श्री. अविनाश मुनीश्वर आणि श्री. लाभेश मुनीश्वर यांनी बांधली आहे.