सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन !
पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या ३१५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेठवडगाव आणि श्री धनाजीराव जाधवराव प्रतिष्ठान पेठवडगाव यांच्या वतीने श्री. सुहासराव जाधव यांच्या हस्ते अभिषेक अन् पूजन करण्यात आले. या वेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशवराव जाधव, सर्वश्री फत्तेसिंह जाधव, सत्वशील जाधव, अशोकराव जाधव, शीतल जाधव, संदीप जाधव, रोहन जाधव, राजेंद्र जाधव, मेजर समीर जाधव, ‘सरसेनापती धनाजीराव जाधवराव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष धनंजय (बंडा) गोंदकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री. सुरेश देवस्थळे, सर्वश्री विजय गुरव, अनिरुद्ध जोशी, अजित तवंदकर, अतुल खराडे, विशाल सनगर, राजेंद्र बुरुड, रवी दुर्गुळे, सोमनाथ गुरव, सौरभ शिंदे, सनी पाटील, सौरभ धामणे, तसेच शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते.